स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची अंमली पदार्थ विरुध्द धडक कारवाई, ब्राऊन हॅरॉईन सदृश्य अंमली पदार्थ विक्री करणे करीता आलेल्या इसमास पकडले.

रत्नागिरी – जिल्हयामध्ये अंमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने धडक कारवाई करणेबाबत मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार हे रत्नागिरी शहरात दिनांक. ०६/०४/२०२५ रोजी पेट्रोलींग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे जयस्थंभ येथील एका हॉटेलच्या शेजारी संशयीत आरोपीत आदिल अशरफ शेख वय ३० वर्ष, रा. गोळप सडा, ता. जि. रत्नागिरी हा आपले दुचाकी वाहनावर बसुन संशयीत हालचाली करीत असताना दिसुन आला. म्हणुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने त्याची चौकशी करुन त्याचे ताब्यातील पिशवी पंचाचे समक्ष तपासुन खात्री केली असता त्यामध्ये ब्राऊन हॅरॉईन अंमली पदार्थाच्या एकुण १५ पुडया व इतर साहित्य असे मिळुन आले. म्हणुन त्यास ताब्यात घेण्यात आले तसेच आरोपीत आदील अशरफ शेख याचेविरुध्द रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. १३१/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपी आदील अशरफ शेख याचेकडुन ब्राऊन हॅरॉईन सदृश्य अंमली पदार्थाच्या १५ पुड्या व ०१ दुचाकी वाहन असा मिळुन एकुण ७७,५००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी व अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक श्री. नितीन ढेरे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ, पोहवा / शांताराम झोरे, बाळू पालकर, दिपराज पाटील व गणेश सावंत यांनी केलेली आहे.
कोकण ऑनलाईन, रत्नागिरी



