कोकणमहत्वाची बातमीराष्ट्रीयसामाजिक
रत्नागिरी जिल्हास्तरीय लोकशाही दिन 7 एप्रिल रोजी

रत्नागिरी – जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे एप्रिल 2025 चा लोकशाही दिन सोमवार दि.7 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दु.1 ते 2 वा. या वेळेत होणार आहे.
लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करु शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.
कोकण ऑनलाईन, रत्नागिरी



