Uncategorizedकृषीकोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्र

आतुरता मान्सूनची, हवामान विभागचा काय अंदाज

पुणे – देशभरातील शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असतात. मान्सूनच्या अंदाजावर शेतकरी शेतीची तयारी करत असतात. हवामान विभाग पावसाचा अंदाज जाहीर करत असते, या वर्षीच्या मान्सूनचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे.

या वर्षी हवामान विभागाने यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाच्या हंगामात अल निनोची शक्यता फेटाळून लावली आहे.

अल निनो हे मध्य उष्णकटिबंधीय प्रशांत महासागराच्या तापमानवाढीमुळे होते. याचा परिणाम भारतात मान्सून दरम्यान होणाऱ्या पावसावर होतो. यामुळे पावसाचा वेग मंदावतो. याबाबत आयएमडीचे मुख्य प्रशासक एम. महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, “हवामान अंदाज आणि आंतरराष्ट्रीय अंदाजांच्या आधारे, आपण मान्सूनसाठी एल निनोची शक्यता नाकारू शकतो. यावर्षी आपल्याला तटस्थ एल निनो परिस्थिती दिसू शकते.

हवामान विभाग अंदाज व्यक्त करत असते

एल निनो म्हणजे मध्य प्रशांत महासागरातील तापमान ०.५ ते १ अंश सेल्सिअसने वाढते. म्हणजे तापमानात लक्षणीय वाढ होत नाही. भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडला आहे. आयएमडी दरवर्षी एप्रिलमध्ये मान्सून पावसाचा पहिला अंदाज जाहीर करत असते.

या वर्षीच्या पावसाचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला एप्रिल महिन्याच्या अंदाजाची वाट पाहावी लागेल, असंही महापात्रा म्हणाले. “हिंद महासागर आणि आजूबाजूच्या समुद्री क्षेत्रांवरील परिस्थिती देखील अंदाजात महत्त्वाची आहे, असंही त्यांनी सांगितले.

कोकण ऑनलाईन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button