आरोग्यकोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनतर्फे ‘डॉक्टर्स डे’ उत्साहात साजरा, ३१ डॉक्टरांचा गौरव

रत्नागिरी – रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनतर्फे राष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रत्नागिरी शहरात अनेक वर्षे निस्वार्थपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या ३१ नामवंत डॉक्टरांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी उपस्थित डॉक्टरांसाठी “Financial Fitness & Wealth Planning for Doctors” या विषयावर विशेष मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले होते. प्रसिद्ध अर्थसल्लागार श्री. सुधीर भगत आणि श्री. दिवीज शिरवईकर यांनी आर्थिक नियोजन, गुंतवणूक, संपत्ती व्यवस्थापन आणि भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता याविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. उपस्थित डॉक्टरांनी या सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रोटरी वर्ष २०२६-२७ मधील हा पहिलाच उपक्रम असून, त्याची संकल्पना व उत्कृष्ट नियोजन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनचे अध्यक्ष रोटे. डॉ. संदीप करे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रत्नागिरी डॉक्टर्स असोसिएशनचे सहकार्य लाभले. तसेच रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनचे सदस्य व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरला.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button