आरोग्यकोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

भाजपा स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता अभियान

भाजपा स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता अभियान

 

रत्नागिरी – ६ एप्रिल भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी शहर मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या उपस्थितीत ६ एप्रिलपासून आठवडाभर हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून बुधवार, दि. ८ एप्रिल २०२६ रोजी मंगळवार आठवडा बाजार, नाचणे रोड (रत्नागिरी) येथे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. सकाळी ६.४५ वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि शहर मंडळ प्रमुख दादा ढेकणे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम पार पडला.

या वेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, कार्यक्रम प्रमुख शेखर लेले, शैलेश बेर्डे, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, उपाध्यक्ष अशोक वाडेकर, चिटणीस राजेंद्र पटवर्धन, पदवीधर सेलचे मनोज पाटणकर, नगरसेवक सुप्रिया रसाळ, नितीन जाधव, तसेच विशाखा भिडे, निलेश आखाडे, भक्ती दळी, सायली बेर्डे, मोहन पटवर्धन, संतोष सावंत, नरेंद्र कदम, संजय आटल्ये, प्रवीण देसाई, प्रसाद बाष्ट्ये, समीर वस्ता, तुषार देसाई, अद्वैत कुलकर्णी, मनोहर दळवी, मंदार भोळे, सोनाली केसरकर, मनाली राणे, अनघा अखीरकर, सारिका शर्मा, प्रणित लेले, गुरुराज कुलकर्णी, किशोर लेले, अर्चना वैशंपायन, प्राची लेले, कैवल्य नातू, रश्मी लेले, आनंद ओक, अविनाश सावंत आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या स्वच्छता अभियानांतर्गत मंगळवार आठवडा बाजार परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. यावेळी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button