कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस उत्साहात; रत्नागिरीत विविध कार्यक्रमांची रेलचेल

रत्नागिरी- आज देशभरात भारतीय जनता पार्टी चा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्षाला यंदा 46 वर्षे पूर्ण झाली असून, देशभरात विविध सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही या दिवसानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.

रत्नागिरीतील भारतीय जनता पार्टी जिल्हा संपर्क कार्यालयात ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.

Oplus_131072

या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्यांसाठी पक्षाचा इतिहास आणि वाटचाल याबाबत माहिती देण्यात आली. विविध वक्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला.

“भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त 12 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे शहर प्रमुख दादा ढेकणे यांनी सांगितले.

या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत सामाजिक, धार्मिक आणि जनसंपर्क उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button