कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

रत्नागिरी जिल्हात प्रथमच पोलीस बँड पथकासह छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास मानवंदना

रत्नागिरी- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच शिवाजी महाराजांच्या स्मारकास पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेसह औपचारिक अभिवादन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पोलीस बँड पथकाने मानवंदना सादर करत शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांना आदरांजली वाहिली.

शिवजयंतीनिमित्त पोलीस बँड पथकासह मानवंदना देण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना ठरली असून, या ऐतिहासिक उपक्रमामुळे कार्यक्रमाला विशेष गौरव प्राप्त झाला.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी, पोलीस बँड पथक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कोकण ऑनलाईन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button