कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

प्रशिक्षणातून नवउद्योजिकांना प्रोत्साहन

बॅंक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था

रत्नागिरी-  बॅंक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थानतर्फे विविध प्रशिक्षणे विनामूल्य देण्यात येतात. एक महिना कालावधीचे एम्ब्रॉयडरी, आरी वर्क, फॅब्रिक पेंटिंग प्रशिक्षणाला जिल्ह्यातून महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला. या प्रशिक्षणाची सांगता त्यांनी प्रशिक्षणात साकारलेल्या विविध वस्तूंच्या विक्री प्रदर्शनाने झाली. याद्वारे त्यांना विक्री व्यवस्थापनाचे धडे गिरवता आले.

बॅंक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात शनिवारी सकाळी हे प्रदर्शन भरवण्यात आले. ३१ दिवसांच्या प्रशिक्षणाची सांगता प्रदर्शनाने झाली. यामधअये प्रशिक्षिका सौ. तृप्ती पतंगे यांनी एक महिना मार्गदर्शन केले. यात एम्ब्रॉयडरीमध्ये हॅंड एम्ब्रॉयडरी, शॅडो वर्क, पॅचवर्क, कट वर्क, जर्दोसी, रिबन, मिरर वर्क, आरी वर्क शिकवले. ट्रॅडिशनल एम्ब्रॉयडरीमध्ये कांथा, कच्छ, चिकनकारी, कमल कडाई, विविध एम्ब्रॉयडरी स्टीचेसमध्ये रन, बॅक, स्टेम, क्रॉस शिकवण्यात आले. फॅब्रिक पेटिंगमध्ये नीब, थ्रीडी, बटिक, ब्लॉक, स्प्रे पेटिंग शिकवले. तसेच वारली, मधुबनी, कलमकारी, पिचवाई, कॅनव्हास पेटिंगही शिकवले.

बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक नरेंद्र देवरे, उप विभागीय व्यवस्थापक अंजनीकुमार सिंग आझाद यांनी प्रदर्शन पाहून सर्वांचे कौतुक केले. तसेच बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी यातील पेटिंग, साडी, कापडी पिशव्या आदी खरेदी करून प्रशिक्षणार्थ्यांना प्रोत्साहन दिले. याप्रसंगी आरसेटी संचालक हृषिकेश कुरणे, बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी आरसेटी कर्मचारी प्रसाद कांबळे, देवेंद्र सांबरे, ऐश्वर्या पिलणकर, विदिशा गावखडकर, प्रसाद शिंदे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button