कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्र

शिरगाव ग्रामपंचायतीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी- रत्नागिरीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव येथे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामपंचायत सरपंच फरीदा रजाक काझी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शिरगाव शाळेतील बाल कलाकारांनी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि झाशीची राणी यांची वेशभूषा साकारत “जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत सादर केले. या कार्यक्रमाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. यानंतर स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत शिरगाव गाव कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी उपस्थित सर्वांनी सामूहिक शपथ घेतली.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे उपसरपंच, ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी, शालेय शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर आयोजित ग्रामसभेमध्ये नूतन उपसरपंच मिलिंद बाणे यांचा सरपंच फरीदा काझी यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोकण ऑनलाईन

26/01/2026

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button