कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

रत्नागिरी नगरपरिषदेच्या विविध समित्यांच्या सभापतींची निवड

रत्नागिरी- रत्नागिरी नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड आज पार पडली. नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

यामध्ये शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी श्री. समीर जगन्नाथ तिवरेकर यांची निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी श्री. संतोष दत्तात्रय कीर, तर पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी श्री. निमेश विजय नायर यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी श्री. राकेश चंद्रकांत नागवेकर, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी श्री. सुहेल अब्दुल लतीफ साखरकर, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी श्रीमती प्रिती रविंद्र सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन निवड झालेल्या सभापतींकडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या निवडीमुळे नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कोकण ऑनलाईन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button