कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक
भक्ती उत्सव” ज्या जागेत संपन्न होणार आहे त्या ठिकाणी गुरूपूजा करून तेथील कामाला प्रारंभ.

रत्नागिरी – विश्वशांतीचे अग्रदूत गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या उपस्थितीत गुरुवार दिनाक 22 जानेवारी 2026 रोजी रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर मैदानामध्ये सायंकाळी 6 वाजता भक्ती उत्सव संपन्न होणार असून,अध्यात्मिक आणि सांस्कृतिक समृद्धीचे महत्व वाढवणाऱ्या या सोहळ्याच्या ठिकाणच्या कामाची सुरवात ही गुरूपूजनाने करण्यात आली.
या गुरुपुजेला आर्ट ऑफ लिव्हिंग टीम रत्नागिरी मधील या भक्ती उत्सवाच्या संयोजिका आणि आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर ऍड जया सामंत,आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर्स सोनिया, विनिता गोखले, भुवना महागावकर,नितीशा मोरे, अनघा देशपांडे, निलेश मिरजकर उपस्थित होते.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी



