कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कामाचा धडाका.. कोकणनगर–कीर्तिनगरमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांची जनतेसाठी धावपळ

रत्नागिरी – नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कोकणनगर व कीर्तिनगर परिसरात नवनिर्वाचित नगरसेवकांनी कामाचा धडाका सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. रत्नागिरी नगर परिषद वार्ड क्रमांक ४ मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. केतन उमेश शेट्ये तसेच सौ. फौजिया तनवीर मुजावर यांनी निवडून येताच प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले आहे.

 

प्रभागात नाळेसफाई, वार्डाची स्वच्छता, स्ट्रीट लाईटच्या समस्या सोडवणे यावर विशेष भर देण्यात येत असून विविध शासकीय योजना व सामाजिक उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने भारत सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या आयुष्मान कार्ड योजनेचे शिबिर दि. ०५/०१/२०२६ व ०६/०१/२०२६ रोजी कोकणनगर व कीर्तिनगर परिसरात आयोजित करण्यात आले होते.

या दोन दिवसीय शिबिरामध्ये सुमारे २५० नागरिकांची आयुष्मान कार्डे नव्याने काढण्यात आली. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत नगरसेवकांचे मनापासून आभार मानले.

यावेळी नागरिकांनी माजी नगरसेवक कार्यसम्राट कै. उमेश शेट्ये साहेब यांच्या कार्यप्रणालीचा ठसा नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये दिसत असल्याची भावना व्यक्त केली. पुढील काळातही प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी ग्वाही नगरसेवक श्री. केतन शेट्ये व सौ. फौजिया मुजावर यांनी दिली.

तसेच भविष्यात प्रभागात राबवण्यात येणाऱ्या सर्व शासकीय व सामाजिक उपक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button