कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे रत्नागिरी तालुका पक्षाच्या वतीने इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जलतरणपटू नोंद झालेली वेदा परेश सरफरे हिचा सत्कार

रत्नागिरी – रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक प्रदिप बोरकर व रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतातील कमी वयाची जलतरणपटू इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद झालेली रत्नागिरीतील एक वर्ष 9 महिने दहा दिवसाची वेदा परेश सरफरे हिने 100 मी अंतर अवघ्या 10 मिनीटे 8 सेकंदामध्ये पार करुन जागतीक विक्रम केल्याबद्दल तिचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे रत्नागिरी तालुका पक्षाच्या वतीने शिवसेना नेते तथा मा.खासदार विनायक राऊत साहेब यांचे संपर्क कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी उपस्थित रत्नागिरी जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत, युवासेना तालुकाअधिकारी संदेश नारगुडे,शिवानी सावंत-माने, जेष्ठ नगरसेविका रशिदा गोदड, श्रीम.राजश्री लोटणकर, पूजा जाधव, उपतालुकाप्रमुख सुभाष रहाटे, महेंद्र चव्हाण, विभागप्रमुख किरण तोडणकर, नयन साळवी, मयुरेश पाटील, शशिकांत बारगोडे, उमेश राऊत, उपविभागप्रमुख राजेश सुर्वे, सचिन सावंतदेसाई, जेष्ठ शिवसैनिक दिपक सुर्वे, जयंत जोशी, जीवन कोळवणकर, पंकज पुसाळकर, अनिल कांटे, मनोज सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button