कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीय
जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक १६ ऑक्टोबरला

रत्नागिरी- दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांनी दिलेल्या पत्रानुसार, जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता रत्नागिरी येथील काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत नगरपरिषद, नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकां संदर्भात चर्चा होणार असून, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची ओळख करून देणे तसेच जबाबदाऱ्या वाटप यावरही निर्णय घेण्यात येणार आहे.याशिवाय, आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवरही चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या बैठकीस राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी व रत्नागिरी शहर येथील सर्व तालुका अध्यक्षांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांनी केले आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



