Uncategorizedकोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

मुक-बधिर विद्यार्थ्यांची दिवाळी सजावट — कौशल्याला रत्नागिरीकरांची दाद मिळावी… प्रभारी मुख्याध्यापक गजानन रजपूत यांचे आवाहन.

रत्नागिरी – रत्नागिरीतील कै. केशव परशुराम अभ्यंकर मुक-बधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यंदाच्या दिवाळी निमित्त आकर्षक हस्तकला वस्तू तयार केल्या आहेत.

 

दिवाळीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या पणत्या, आकाशकंदील, भेटवस्तू, वारली पेंटिंग, मोबाईल स्टॅन्ड यांसारख्या सुंदर वस्तू विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केल्या आहेत.

या सर्व वस्तू तयार करताना विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विशेष परिश्रम घेतले, त्यामुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य अधिक खुलून आले आहे. या हस्तकला वस्तूंना रत्नागिरीकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी या वस्तूंची खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक गजानन रजपूत यांनी नागरिकांना या विद्यार्थ्यांच्या कला प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि त्यांच्या प्रयत्नांना दाद द्यावी, असे आवाहन केले आहे.

कोकण ऑनलाईन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button