समाजसेवक सौरभ मलुष्टे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

रत्नागिरी – समाजासाठी निस्वार्थीपणे काम करणारा सच्चा माणूस म्हणजे सौरभ मलुष्टे गेली दहा-बारा वर्षं ते विविध सामाजिक उपक्रमांतून हजारो गरजूंना मदत करत आहेत. कोरोना काळात त्यांनी दिवसरात्र केलेल्या कार्याची तर जिल्ह्यात आजही चर्चा आहे. स्वतःचा व्यवसाय सांभाळूनही समाजासाठी सतत कार्यरत राहणारे, मनमिळावू, प्रामाणिक आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख झाली आहे.

पैशापेक्षा माणसं कमावणं हीच खरी संपत्ती असल्याचं उदाहरण म्हणजे सौरभ मलुष्टे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात त्यांचं कार्य पोहोचलेलं असून अधिकारीही त्यांच्या कामाचं कौतुक करतात. समाजसेवेसोबतच एक यशस्वी तरुण उद्योजक म्हणूनही त्यांनी वेगळी छाप पाडली आहे.
आज सौरभ मलुष्टे यांचा वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना व्यक्त होत आहे.
श्री. निलेश मनिषा मोहन जगताप
संपादक – कोकण ऑनलाईन



