सोमेश्वर ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

रत्नागिरी- तालुक्यातील सोमेश्वर ग्रामपंचायतीत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती पुढे आली आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

स्थानिक नागरिक कौस्तुभ नागवेकर यांनी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सोमेश्वर गावातील मुलांच्या कुपोषण रेखणे यासाठी तब्बल 26,250 रुपयांचा खर्च दाखवण्यात आला. मात्र प्रत्यक्षात त्यासाठी कोणताही खर्च करण्यात आलेला नाही. त्याबाबतची दस्तऐवज स्वरुपातही खात्री नाही.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, मुलांच्या पोषणासाठी शासनाकडून मंजूर झालेले पैसे खर्च न करता रेकॉर्डवर खोटे दाखले देऊन खर्च दाखवण्यात आला. हा प्रकार अत्यंत गंभीर असून बालकांच्या आरोग्याशी संबंधित गैरव्यवहार केल्याने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
या संदर्भात जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच अपहार केलेली रक्कम वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



