कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

भाजप युवा मोर्चाच्या वतीने शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप

रत्नागिरी – भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रत्नागिरीच्या वतीने ल.ग.पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरी येथे लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर यांच्या वतीने करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम करण्यात आला. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत भविष्यात देशासाठी हे काम करणार आहे मोदीजी यांचे विकसित भारताचे भविष्य हे विद्यार्थी आहेत. हा उद्देश समोर ठेऊन हा उपक्रम करण्यात आला असल्याचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर यांनी सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका राजवाडे मॅडम यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. 

मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे  जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम करण्यात आला. यावेळी मनोजजी पाटणकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, वर्षाताई ढेकणे, दादा ढेकणे, पल्लवी ताई पाटील, देवराज सुर्वे, निलेश आखाडे, राजन पटवर्धन, ज्ञानेश पोतकर, बाबा नाचनकर, सुचिता नाचणकर, मंदार भोळे, संदीप रसाळ, सुप्रिया रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कोकण ऑनलाईन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button