रत्नागिरी भाजप युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

रत्नागिरी – भारतीय जनता पार्टीचे नेते व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच रत्नागिरीचे संपर्कमंत्री व राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी भाजप दक्षिण युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी येथे होणार असून, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर यांनी केले आहे.
या उपक्रमासाठी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर व महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे यांनी विशेष प्रयत्न करत आहेत.
कोकण ऑनलाईन



