कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

“कांचन डिजिटल रत्नागिरी तालुकाबाह्य घरगुती गणपती सजावट ऑनलाईन स्पर्धा” निकाल जाहीर

रत्नागिरी – रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर आयोजित “कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट ऑनलाईन स्पर्धा” मोठ्या दिमाखात पार पडली. या स्पर्धेची लोकप्रियता रत्नागिरी तालुक्याबाहेर मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे यंदा रत्नागिरी तालुक्याबाहेरूनही गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणावर आग्रहाने सहभाग नोंदवला. त्यामुळे त्यांना न डावलता त्यातून “कांचन डिजिटल रत्नागिरी तालुकाबाह्य घरगुती गणपती सजावट ऑनलाईन स्पर्धा” घेण्याचा निर्णय आयोजक कांचन मालगुंडकर यांनी घेतला.

रत्नागिरी तालुक्याबाहेरून राजापूर, लांजा, देवरुख, संगमेश्वर या तालुक्यातील गणेशभक्तांनी मोठा सहभाग घेतला. त्यातून “कांचन डिजिटल रत्नागिरी तालुकाबाह्य घरगुती गणपती सजावट ऑनलाईन स्पर्धा” घेण्यात आली. त्यांच्यातूनही प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देण्याचे कांचन यांनी ठरवले. त्यानुसार परीक्षकांनी त्यांचे व्हिडिओ पाहून ऑनलाईन परीक्षण केले आणि आज त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला.

“कांचन डिजिटल रत्नागिरी तालुकाबाह्य घरगुती गणपती सजावट ऑनलाईन स्पर्धा” सविस्तर निकाल खालीलप्रमाणे :-

• प्रथम क्रमांक ( 3 हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) – सुनील खापरे, बावनदी

( नशामुक्ती भारत )

• द्वितीय क्रमांक ( 2 हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) – विपुल कुंभारी, परचुरी

( रत्नागिरी रेल्वे स्टेशन)

• तृतीय क्रमांक ( 1हजार 500 व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र ) – प्रदीप धनावडे, संगमेश्वर

( पृथ्वीचा समतोल )

• विशेष उल्लेखनीय (1 हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र )

*अनिल नार्वेकर, अडिवरे

( संत तुकाराम)

* सार्थक देसाई, संगमेश्वर

( गडकिल्ले )

रत्नागिरी तालुका “कांचन डिजिटल रत्नागिरी तालुकाबाह्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा” या मुख्य स्पर्धेसोबत या तालुकाबाह्य ऑनलाईन स्पर्धेचा दिमाखदार पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी दिनांक 13 रोजी ठीक 4 वाजता जयेश मंगल पार्क, माळनाका येथे संपन्न होणार आहे. तरी सर्व विजेते व गणेशभक्तांनी या समारंभाला अवश्य उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक कांचन मालगुंडकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button