कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्र

रत्नागिरीत सुमारे अडीच कोटी किमंतीची अंबरग्रीस जप्त

रत्नागिरी – रत्नागिरी एम.आय.डी.सी. येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सुमारे दोन कोटी पन्नास लाख रुपये किमतीचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले . याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी एक इसम “लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस)” विक्रीसाठी एम.आय.डी.सी. रत्नागिरी येथे घेऊन येणार असल्याबाबत गोपनीय माहीती पोलिसांना मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली, एक पथक तयार करण्यात आले व या पथकाने एम.आय.डी.सी. रत्नागिरी येथे सापळा रचला व दिनांक १ ऑगस्ट रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास एम.आय.डी.सी रत्नागिरी परिसरात छापा टाकला असता आरोपी इसम एजाज अहमद युसूफ मिरकर ( वय ४१ रा. घर नंबर ३७४६ , पिंगी मोहल्ला मिरकरवाडा ता. जि. रत्नागिरी सध्या रा. कदमवाडी, कोकणनगर, रत्नागिरी ) याने “लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस)” आपले ताब्यात विक्री करण्याचे उद्देशाने बाळगले असताना तो मिळून आल्याने त्याच्यावर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर १५२ / २०२५ वन्य जीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ३९ , ४२, ४३, ४४, ४८, ५१, ५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी इसम एजाज अहमद युसूफ मिरकर याच्या ताब्यातून एकूण २.५ किलो वजनाची ₹२,५०,००,००० /- किंमतीची “लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस)” व एक ₹५०,००० /- रुपये किंमतीची मोटार सायकल असा एकूण ₹२,५०,५०,००० /- (दोन कोटी पन्नास लाख पन्नास हजार) रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व श्रेणी. पोलीस उप-निरीक्षक, संदीप ओगले, पो.हेकॉ विजय आंबेकर,पो. हेकॉ दिपराज पाटील,पो.हेकॉ विवेक रसाळ व पो.हेकॉ गणेश सावंत आणि चालक पो.कॉ अतुल कांबळे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button