कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

रत्नागिरीसाठी एकत्रित डॅशबोर्ड तयार होणार- पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची सूचना

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व विभागांची माहिती, लोकप्रतिनिधींच्या निधीतून झालेली विकासकामे, आणि जनतेच्या मागणीपत्रांवरील कार्यवाही एका क्लिकवर पाहता यावी, यासाठी एकत्रित डॅशबोर्ड तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हा प्रस्ताव मांडला. डॅशबोर्डवर रुग्णवाहिकांचा प्रतिसाद वेळ, रस्त्यांची स्थिती, तसेच स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणि वयोमर्यादेनुसार नागरिकांची माहितीही उपलब्ध होणार आहे.मुख्यमंत्री डॅशबोर्डच्या धर्तीवर पेपरलेस कार्यपद्धतीने हे तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button