कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीय

शिवसेना ‘उबाठा’कडून वर्धापन दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरी – शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा १९ जून रोजी ५९ वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. यासंदर्भात नियोजनासाठी माजी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार बाळ माने व संपर्कप्रमुख सुदर्शन तोडणकर यांच्यासह तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, महेंद्र चव्हाण, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, विभागप्रमुख किरण तोडणकर, मयुरेश पाटील, अमित खडसोडे, राजन शेट्ये, प्रशांत सुर्वे, बिपिन शिवलकर, दिलावर गोदड, बंड्या सुर्वे, साजिद पावसकर, राजेंद्र नेरकर, उपशहर संघटक उन्नती कोळेकर, राजश्री लोटणकर, स्मिता काटकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

वर्धापन दिनानिमित्त सकाळी १० वा. शिवसेना शाखा साळवी स्टॉप येथे छत्रपती शिवाजी महाराज व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन खाऊवाटप कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर स १०.३० वा. शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय रत्नागिरी येथे छत्रपती शिवाजी महाराज व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला

पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. संपर्क कार्यालयात दुपारी ३ वा. सत्यनारायण महापूजा, सायं. ५ ते ६.३० वा. भजन, सायं. ७.३० ते ८.३० वा. महाप्रसाद होणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील व शहरातील सर्व शिवसेना, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, जेष्ठ शिवसैनिक, आजी – माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button