कोकणक्रीडामहत्वाची बातमीमहाराष्ट्र

जिल्हास्तरीय भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेत यंग बॉईज संघ, फगरवठार विजयी

रत्नागिरी – राजवाडी क्रीडा मंडळ, भगवती बंदर, किल्ला रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेचा अंतिम सामना भगवती स्पोर्ट्स किल्ला विरुद्ध यंग बॉईज फगरवाठार यांच्यात अटीतटीचा झाला यामध्ये यंग बॉईज फगरवठार संघ विजयी ठरला.

रत्नागिरीतील भगवती बंदर किल्ला येथे दरवर्षी अक्षयातृतीया निमित्त राजवाडी क्रीडा मंडळ या स्पर्धेचे भव्य आयोजन करत असतात. यावर्षी या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत 16 संघाने सहभाग घेतला.

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ राजवाडी क्रीडा मंडळ अध्यक्ष सुधाकर मोंडकर, उपाध्यक्ष प्रवीण दळवी, माजी नगरसेवक संतोष कीर, राकेश नागवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रतीक मोंडकर, संदेश सारंग,संतोष डोके, विजय चव्हाण,श्रीकांत सारंग, प्रवीण बापर्डेकर आदी उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजवाडी क्रीडा व सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी मोठी मेहनत घेतली.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button