कोकणपर्यटनमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

भविष्यात विश्वमंगल गाेशाळा समाजाचे श्रध्दास्थान ठरेल- डॉ. परमार्थ देवजींचा विश्वास! 

रत्नागिरी – गाे मातेवरील प्रेमाची प्रेरणा घेऊन नि:स्वार्थी भावनेने सुरू केलेले हे महत्कार्य काैतुकास्पद असून भविष्यात हे स्थान संपूर्ण समाजाचे श्रध्दास्थान म्हणून ओळखले जाईल असा विश्वास पतंजली याेगपिठाचे स्वामी तसेच याेगगुरू श्री रामदेव बाबा यांचे शिष्य डॉ. परमार्थ देवजी यांनी व्यक्त केला. 

ते आज साेमेश्वर शांतिपीठ, रत्नागिरी यांनी आयाेजित केलेल्या विश्वमंगल गाेशाळा, साेमेश्वर येथील एका कार्यक्रमात बाेलत हाेते. याप्रसंगी प्रथम सोमेश्वर शांतीपीठ विश्व मंगल गोशाळेचे अध्यक्ष श्री राजेश आयरे यांनी सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी या प्रकल्पाची माहिती दिली त्यांनी स्वामीजी व पतंजली योगविद्य पिठाचे सर्व कार्यकर्ते यांचे हार्दिक स्वागत केले

.या प्रसंगी डॉ. देवजी यांनी साेमेश्वर शांतिपीठाच्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन त्यांच्या कार्याचे मनस्वी काैतुक केले. ते म्हणाले कि गाेमाता ही काेट्यवधी देवदेवतांची अधिष्ठाता आहे. तिची सेवा-सुश्रुषा व संगाेपन करणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची सेवा करणेच हाेय. या कार्यात अनेक अडचणी व कठीण प्रसंग येतील परंतु त्यावरील उपाय व मार्गही गाेमातेच्या आशिर्वादाने प्राप्त हाेतील. निष्काम सेवा कधीही वाया जाणार नाही उलट भविष्यात या महत्कार्यात आणखी अनेक हात पाठीशी उभे राहतील व शांतीपीठाचे सर्व संकल्प उत्तमरित्या पूर्ण हाेतील. हे स्थान म्हणजे सकल समाजासाठी केवळ श्रध्दास्थान न राहता एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांच्यासाेबत पतंजली याेगपिठाचे अनेक मान्यवर उपस्थित हाेते. शांतिपीठाचे अध्यक्ष श्री आयरेसर, श्री पाटील सर, श्री साने, श्री प्रकाश मुळे, श्री अमाेल चाटे, श्री सुरेश दात्ये आदींसह अनेक विश्वस्त उपस्थित हाेते.

कार्यक्रमापूर्वी डॉ परमार्थ देवजी यांचे सुवासिनींच्या हस्ते पंचारतीने आैक्षण करण्यात आले. या प्रसंगी श्री प्रकाश मुळे यांनी केलेल्या एका संकल्पाबद्दल त्यांचा डॉ. देवजींच्या हस्ते सपत्निक सन्मान करण्यात आला. कार्यक्रमानंतर डॉ. देवजी यांनी गाेशाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली व उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

कोकण ऑनलाईन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button