कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माहेर संस्थेला मोफत बोअरवेलर- रत्नागिरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम

रत्नागिरी- माजी जी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रत्नागिरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून निवळी येथील माहेर या अनाथ निराधारांसाठी काम करणाऱ्या संस्थेची पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी बोअरवेल पाडून देण्यात आली. याचा शुभारंभ आज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

पाणी म्हणजे जीवन आहे आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात तर पाण्याचे महत्व प्रामुख्याने कळतं कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडत असला तरीसुद्धा कोकणात उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष असते. रत्नागिरी शहरा नजीकच्या निवळी येथील माहेर संस्थेलाही पाण्याच्या या समस्येला दरवर्षी तोंड द्यावे लागते. याबाबत संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी रत्नागिरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पाण्याच्या समस्येबाबत सांगितलं होते. या समस्येची दखल घेत या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देशाचे माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या गुरुवार दिनांक 10 एप्रिल रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज बुधवारी 9 एप्रिल रोजी माहेरी संस्थेच्या परिसरामध्ये बोरवेलचे भूमिपूजन केले. रत्अनागिरी सार्सूवजनिक गणेशोत्नसव मंडळ स्वखर्चाने माहेर संस्थेला येथे बोअरिंग पाडून देत आहे.

या निमित्ताने बाहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी खा. नारायण राणे यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. कुडाळ मालवणचे आ. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ काम करते. या यावेळी मंडळाचे अध्यक्ष योगेश मगदूम यांच्यासह या सर्व उपक्रमांमध्ये रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष अनुष्का शेलार, सचिव प्रवीण लिंगायत, खजिनदार अमोल देसाई, शिवाजी कारेकर, अजय लिंगायत, राहुल भाटकर, अमित देसाई, अमृत गोरे, साई सावंत, ययाती शिवलकर, श्रीनाथ सावंत, निखिल शेट्ये, नितीन पवार, ओंकार आंब्रे, सौ. प्रणाली तोडणकर- धुळप, अनघा निकम मगदूम, प्रणव सुर्वे, रोहित भुजबळराव, सागर सोलकर, सौ. अश्विनी देसाई, सतीश लिंगायत, कृष्णा पाटील, सिद्धेश धुळप, विशाल कांबळे, अभी कारेकर, बाबा भोळे, प्रशांत देसाई, राजेश झगडे, दुर्गेश पिलणकर, अंकुर मोहिते, उद्देश लाड, यांनी सक्रीय सहभाग घेतला.

कोकण ऑनलाईन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button