महत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीय
महाराष्ट्र सैनिकांनो, आता हे आंदोलन….राज ठाकरे यांचा नवा आदेश

रत्नागिरी – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर झालाच पाहिजे. त्यासाठी बँकेत जा… असे आदेशच मनसैनिकांना दिले होते. त्यानंतर मनसैनिकांनी बँकेत जाऊन मराठी भाषेचा वापर करण्यासाठी बँक मॅनेजरला निवेदन दिलं होतं. तसेच बँकांमधील हिंदी आणि इंग्रजीचे बोर्ड उतवरण्यात आले होते. राज्यातील सर्वच जिल्ह्यात हे आंदोलन सुरू होतं. तसेच अनेक बँकामध्ये मराठीचा वापरही सुरू झाला होता. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एक मनसैनिकांच्या नावाने एक पत्रक फेसबुकवर टाकलं आहे. तसेच या आंदोलनाबाबतची नवीन सूचनाही आपल्या सैनिकांना राज ठाकरे यांनी दिली आहे.
कोकण ऑनलाईन, रत्नागिरी



