महत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीय

बँकेतील व्यवहार मराठीत करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरीचा बँकांना इशारा

रत्नागिरी – मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दलकर,जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर,उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष बाबय भाटकर यांनी आज रत्नागिरी शहरातील सर्व बँकेमध्ये भेट देऊन बँकेतील सर्व व्यवहार मराठीत करा तसेच ग्राहकांसोबत मराठीतच संवाद व्हावा अशी मागणी करून निवेदन दिले. आणि आगामी आठ दिवसात हे बदल दिसावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी शहर अध्यक्ष बाबय भाटकर,महिला शहर अध्यक्ष संपदा राणा, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button