श्री सत्यसाई जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी- श्री सत्यसाई बाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने श्री सत्यसाई सेवा समिती, रत्नागिरी यांच्या वतीने विचारांवर आधारित जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी रंजन हॉल, शिर्के हायस्कूल, रत्नागिरी येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत यशस्वी ठरणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकांच्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रथम पारितोषिक रु. ५,०००/- व सन्मानचिन्ह,
द्वितीय पारितोषिक रु. ३,०००/- व सन्मानचिन्ह,
तृतीय पारितोषिक रु. २,०००/- व सन्मानचिन्ह असे असणार आहे.
स्पर्धेसाठी खालील विचारांवर आधारित रांगोळी काढावी लागणार आहे.
१) निसर्ग हाच देव
२) विविधतेतून एकता
३) मातृ पितृ देवो भव
४) दानधर्म / मदत हाच खरा धर्म
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत. रांगोळीचा आकार ३ × ४ फूट असावा. स्पर्धा ठरलेल्या वेळेतच पूर्ण करणे बंधनकारक असून आयोजकांनी दिलेल्या जागेतच रांगोळी काढावी लागेल. रांगोळी दिलेल्या विषयावर आधारित असावी. सर्व साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे. एका रांगोळीसाठी एकाच स्पर्धकास सहभाग घेता येईल. वेळ संपल्यानंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत. प्रवेश मर्यादित असून प्रथम येणाऱ्या २० प्रवेशिका स्वीकारल्या जातील. स्पर्धा सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत होणार आहे. रांगोळी विषयाचे स्केच काढून आणण्यास परवानगी आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
नाव नोंदणीची अंतिम तारीख शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी
श्री. भूषण बेलवलकर – ९३७०२८५१९९ / ९४२२६६०३०३
श्री. राहुल कळंबटे – ७३५०२१२४४०
या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



