कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्र
मिरकरवाडा येथे मच्छीमारावर जिवघेणा हल्ला; शिमगोत्सवातील वादाची पार्श्वभूमी

रत्नागिरी – शहरानजीकच्या मिऱ्या परिसरातील मिरकरवाडा येथे एका मच्छीमारावर जिवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयेंद्र नार्वेकर (वय ६०) असे जखमी व्यक्तीचे नाव असून ते व्यवसायाने मच्छीमार आहेत. त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
चार दिवसांपूर्वी शिमगोत्सवादरम्यान रांगोळीच्या कारणावरून झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
जखमी जयेंद्र नार्वेकर यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कोकण ऑनलाईन



