भाजपा महिला मोर्चा तालुका मध्य मंडलची कार्यकारिणी जाहीर..
सौ. वर्षा ताई ढेकणे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

रत्नागिरी- आज दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात तालुका मध्य मंडल महिला मोर्चाची नवीन कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ताई ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यकारिणी तयार करून जाहीर करण्यात आली.
तालुका अध्यक्ष सौ. सुचिता नाचणकर यांच्या नियोजनातून व सहकार्याने ही कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ताई ढेकणे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस सौ. नुपुरा मुळये यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली –
तालुकाध्यक्ष : सौ. सुचिता नाचणकर
उपाध्यक्ष : सौ. सायली रवींद्र केतकर
सरचिटणीस : सौ. शिवानी दिनेश रेमुळकर
सचिव : सौ. मेधा संजय देवस्थळी
सहसचिव : सौ. अनुष्का शेलार
कोषाध्यक्ष : सौ. संपना महेंद्र सावंत
सदस्य :
सौ. मंजिरी मंगेश चव्हाण, सौ. शुभांगी सुभाष घाणेकर, सौ. किंजल अभय लिंगायत, सौ. कीर्ती मंगेश मोडक, धनश्री सुरेंद्र देसाई, सौ. नेत्रा नितीन करंदीकर, सौ. नम्रता नितीन इंगावले व सौ. वैभवी विनोद पालेकर.
यावेळी सर्व नवनियुक्त महिलांनी एकत्र येऊन जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच दिलेल्या पदाला योग्य न्याय देत भारतीय जनता पार्टीचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी सक्रिय योगदान देण्याचे आश्वासन जिल्हाध्यक्षांना दिले.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



