कोकणक्रीडामहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

गणराज ग्रुप आयोजित भव्य नाईट जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला दमदार सुरुवात

रत्नागिरी – गणराज ग्रुप आयोजित भव्य नाईट जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले. या स्पर्धेचे उद्घाटन व्हॉलीबॉल राज्य असोसिएशनचे उपाध्यक्ष रविकिरण रेडीज तसेच भगवती देवी देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर मोंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी रत्नागिरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे, संदीप कीर, सूर्यकांत मोंडकर, शशिकांत साळवी, आशिष सुर्वे, प्रदीप साळवी, विरेश मयेकर, अमित लांजेकर, मिलिंद मोरे, सिद्धेश लाखण, शैलेंद्र पुजारी तसेच गणराज ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणराज ग्रुपतर्फे उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग असून, रत्नागिरीतील व्हॉलीबॉल क्षेत्रात ही स्पर्धा मानाची ‘चॅम्पियन ट्रॉफी’ म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना संधी मिळावी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी गणराज ग्रुप सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

तसेच क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही गणराज ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button