कोकणमहत्वाची बातमीसामाजिक
प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक महेंद्र शेठ जैन यांना वाढदिवसानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या शुभेच्छा
रत्नागिरी- राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी दौऱ्यावर आले असता रत्नागिरीतील ज्येष्ठ उद्योजक व प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक श्री. महेंद्र शेठ जैन यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ‘निलकमल’ निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी ना. उदय सामंत यांनी विविध सामाजिक व विकासात्मक विषयांवर सखोल संवाद साधला. शेठजींचा अनुभव आणि सकारात्मक दृष्टिकोन सदैव प्रेरणादायी ठरतो, असे यावेळी श्री. सामंत यांनी आवर्जून नमूद केले. ना. उदय सामंत यांनी त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व यशस्वी जीवनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी विकी जैन, प्रवीण जैन उपस्थित होते.
कोकण ऑनलाईन



