कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

पत्रकारांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरे

रत्नागिरी – रत्नागिरीतील पत्रकारांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडले.या स्नेहसंमेलनानिमित्त क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या स्नेहसंमेलनात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

दैनंदिन धावपळीच्या कामातून थोडा विरंगुळा मिळावा, आपसातील स्नेह अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या या स्नेहसंमेलनाला पत्रकारांकडून मोठे महत्त्व दिले जाते. स्नेहसंमेलनात आयोजित करण्यात आलेली क्रिकेट स्पर्धा विशेष आकर्षण ठरली.

रंगतदार सामने, चुरशीची लढत आणि प्रेक्षकांचा उत्साह यामुळे मैदानावर खऱ्या अर्थाने खेळाची मेजवानी पाहायला मिळाली. शिर्के हायस्कूल येथे पार पडलेल्या या स्नेहसंमेलनात पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबीयांनीही सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला.

नृत्य, गीते, मनोरंजनात्मक सादरीकरण यामुळे संपूर्ण परिसरात आनंदी वातावरण निर्माण झाले होते.मैत्री, आपुलकी आणि विरंगुळ्याचा सुंदर संगम असलेले हे पत्रकारांचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button