सुकापूर येथे महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य हळदीकुंकू व व्याख्यान कार्यक्रम उत्साहात संपन्न
सुकापूर, दि. १ मे २०२६ : महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुकापूर येथे शिवसेनेच्या वतीने भव्य दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये हळदीकुंकू समारंभासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी सुमारे साडेसात वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवसेना उपनेते श्री. बाळ माने, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अनिल चव्हाण तसेच विधानसभा संघटक दीपक निकम यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर चैतन्य महाराज बुरुडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम व विचारांवर सुमारे एक तास प्रभावी व्याख्यान दिले. त्यांच्या व्याख्यानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
त्यानंतर महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
या वेळी शिवसेना सुकापूरचे विभाग प्रमुख धनंजय पाटील, विशाल भोईर, उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, शाखा प्रमुख हनुमंत खंडागळे, महिला आघाडीच्या भारती गोसावी तसेच शिवसेना प्रणीत डॉ. सेल महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ. आशिष बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



